परंड्याचे सुपुत्र जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचा मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते गौरव!

कॅन्सरवरील क्रांतिकारी संशोधनाबद्दल भाजप संपर्क कार्यालयात फेटा बांधून करण्यात आला  मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

यशश्री अपडेट्स: परंडा (प्रतिनिधी)
परंडा शहराचे सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ प्रा. डॉ. गजानन राशीनकर यांचा जगातील अव्वल (टॉप) शास्त्रज्ञांच्या यादीत समावेश झाल्याबद्दल, परंडा येथील भाजप संपर्क कार्यालयात त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. भाजपचे ज्येष्ठ नेते मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते डॉ. राशीनकर यांना फेटा बांधून, शाल व पुष्पहार अर्पण करून गौरविण्यात आले.

स्तनाच्या कर्करोगावर क्रांतिकारी संशोधन; आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त

प्रा. डॉ. गजानन राशीनकर हे सध्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात आघाडीचे संशोधक आणि रसायनशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी अनेकवेळा सेट-नेट (SET-NET) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा विक्रमही केला आहे.
डॉ. राशीनकर यांनी महिलांच्या स्तनाच्या कर्करोगावर (Breast Cancer) ‘हायपरथर्मिया’ आणि ‘चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती’ या विषयावर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी संशोधन केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारतीय पेटंटसह अत्यंत मानाचे आंतरराष्ट्रीय युके (UK) पेटंट देखील प्राप्त झाले आहे.

माता-भगिनींची ‘किमोथेरपी’च्या त्रासातून होणार मुक्तता

संशोधनाचे महत्त्व: डॉ. राशीनकर यांच्या या ‘नॅनो मेडिसिन’ क्षेत्रातील संशोधनामुळे आता कर्करोगावर कोणत्याही शस्त्रक्रियेविना आणि जखम न होता उपचार करणे शक्य होणार आहे. यामुळे कॅन्सरग्रस्त माता-भगिनींची किमोथेरपीच्या जीवघेण्या आणि अत्यंत वेदनादायी त्रासातून कायमची मुक्तता होणार आहे.

याशिवाय, संशोधन क्षेत्रात पर्यावरणपूरक पद्धतीने नवीन रासायनिक संयुगे बनवणे आणि कॅन्सर प्रतिबंधक संयुगांच्या जैविक दृष्ट्या सक्रिय रेणूंचे संश्लेषण (Synthesis) करणे, यात त्यांचे कार्य जागतिक पातळीवर उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या याच यशाने परंडा शहराच्या व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या गौरव सोहळ्याप्रसंगी परंडा व परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. यामध्ये:

  • उमाकांत गोरे (भाजपा शहराध्यक्ष)
  • समरजीतसिंह ठाकूर (उपनगराध्यक्ष, परंडा नगरपरिषद)
  • रमेशसिंह परदेशी (नगरसेवक)
  • ॲड. जहीर चौधरी (प्रदेश कार्यकारिणी सदस्य)
  • ॲड. अनंत राशीनकर
  • ॲड. तानाजी गरड
  • कृष्णा चैतन्य
  • धनंजय काळे
  • मनोहर पवार
  • गौरव पाटील
  • आकाश मदने
    यांच्यासह इतर अनेक मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. राशीनकर यांच्या या जागतिक यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *