सेवा सरकार केंद्रांच्या कामकाजावर प्रशासनाची नजर; नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई अटळ-नायबतहसीलदार पूजा गोरे

यशश्री अपडेट्स-परंडा(प्रतिनिधी):

दि. ४ (प्रतिनिधी) परंडा तहसीलदार निलेश काकडे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार पुजा गोरे यांनी परंडा तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्राची तपासणी केली आहे.

आपले सरकार सेवा केंद्राची तपासणीदरम्यान सेतू चालक यांना इतर दर पत्रक, क्यू आर कोड, बैठक व्यवस्था, पिण्याचे पाण्याची सोय, अनुषंगिक व्यवस्था यासह आपले सरकार सेवा केंद्रावर नागरीकांना दिल्या जाणाऱ्या सुविधेबाबत पहाणी केली.

केंद्रावर असलेल्या त्रुटीची तात्काळ पुर्तता करणे, तसेच नागरिकांना वेळेत व दर्जेदार सेवा देणे, शासकीय दरानुसार

फीस घेणे, इतर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नोंदी अद्ययावत ठेवाव्यात.

तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्र चालकांनी

आपले सरकार सेवा केंद्रावर कामकाज करावे

अन्यथा शासकीय नियमानुसार आपणावर योग्यती कारवाई करण्यात येईल अशा सूचना तपासणी दरम्यान केंद्र चालकांना देण्यात आल्या.

तपासणी दरम्यान नायब तहसीलदार पुजा गोरे यांच्या सह

मंडळाधिकारी दुर्गाप्पा पवार, ग्राम महसूल अधिकारी विष्णू जाधव, महसूल सहाय्यक अमोल हंकारे, संगनक चालक आण्णा मगर, वाहन चालक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *