डॉ. सचिन चव्हाण यांची MPCB सदस्यपदी निवड; पर्यावरण व्यवस्थापनाला मिळणार बळ

यशश्री अपडेट्स-परंडा(प्रतिनिधी)-
शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.डॉ सचिन सुभाषराव चव्हाण यांची नुकतीच सदस्य सचिव जिल्हा पर्यावरण समिती धाराशिव व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयाने सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर, अध्यक्ष सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, प्रा. डॉ शहाजी
चंदनशिवे, कनिष्ठ विभा विभागाचे पर्यवेक्षक डॉ. किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, महाविद्यालयाच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीम पद्मा शिंदे यांनी प्रा.डॉ. सचिन चव्हाण यांचे अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

प्रा.डॉ. सचिन चव्हाण हे रा.गे. शिंदे महाविद्यालयामध्ये संशोधक मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत तसेच त्यांनी युनिसेफ अंतर्गत ग्रीन क्लब धाराशिव जिल्हा येथे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत तसेच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ सदस्य म्हणून काम करत आहेत वृक्ष संवर्धन समितीचे महाराष्ट्र राज्याचे मार्गदर्शक म्हणून ते काम करत आहेत त्यांच्या या निवडीमुळे महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ विभागातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, मित्र परिवार यांनी अभिनंदन केले व पुढील त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *