यशश्री अपडेट्स | छत्रपती संभाजीनगर :
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी कोणतेही मोठे शक्तिप्रदर्शन अथवा गाजावाजा न करता, पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा हा दिवस केवळ निवडणुकीतील औपचारिकता नसून, मराठवाड्यातील विविध घटकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्याच्या भूमिकेची सुरुवात असल्याचे उमेदवाराने यावेळी सांगितले.
मराठवाड्यातील पदवीधर युवकांसमोर रोजगाराच्या संधींचा अभाव, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी, शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न तसेच शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना दुष्काळ, शेतीमालाला योग्य भाव, सिंचन आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यासाठी सातत्याने आवाज उठवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘पदवीधरांचा आवाज विधान परिषदेत बुलंद करू’
पदवीधर मतदारसंघ हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित विषय नसून, या मतदारसंघातील प्रत्येक पदवीधराच्या अपेक्षा आणि भविष्यासोबत जोडलेला आहे. युवकांना रोजगार, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व स्पर्धा परीक्षांसाठी योग्य सुविधा, शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
शक्तिप्रदर्शन करून राजकीय ताकद दाखवण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याला प्राधान्य देणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना साधेपणाला महत्त्व देत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी माजी मंत्री राजेश भैय्या टोपे, माजी मंत्री फौजियाताई खान, माजी आमदार चंद्रकांत दानवे, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी आमदार पृथ्वीराज साठे, खासदार बंधू जगन्नाथजी काळे मोतीवाला, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख, राष्ट्रीय युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणाताई सलगर, पदवीधर निवडणूक प्रमुख नरेंद्रजी काळे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीहंबीरे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे, जिल्हाध्यक्ष संजय काळबांडे, जगन्नाथ काळे, मुस्ताक अहमद, राजेश पवार, आशिष पवार, अतुल गावंडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

आगामी काळात मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर देण्यात येणार असून, पदवीधर, युवक, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करण्याची भूमिका उमेदवारी अर्ज दाखल करताना मांडण्यात आली.
